23.8 C
Latur
Tuesday, August 4, 2020
Home राष्ट्रीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोरोनाची व्हायरसची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली आहे.

दिल्लीत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमित शाह अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. दिल्लीत वाढलेल्या चाचण्यांचे श्रेय महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहांना दिले आहे. मात्र गेल्या काही दिवसात अमित शाह यांनी अनेक कार्यक्रमांनाही उपस्थिती लावली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात अनेक जण आले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. यासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. मात्र या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहू शकणार नाहीत, असे दिसते.

Read More  ‘वॉशिंग्टन पोस्ट’कडून धारावी पॅटर्नचा गौरवोद्गार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,132FansLike
34FollowersFollow