22.5 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeराष्ट्रीयकेंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल मोदी सरकारमधून देणार राजीनामा

केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल मोदी सरकारमधून देणार राजीनामा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मोदी सरकारमधील एक महिला मंत्री राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. एसएडी सदस्य आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल या मोदी सरकारमधून राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. कृषी संबंधित विधेयकाच्या विरोधात हरसिमरत कौर बादल राजीनामा देणार आहे. शिरोमणि अकाली दल नेता सुखबीर सिंह बादल यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, पार्टी नेता आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल संसदेत आणलेल्या कृषी संबंधित विधेयकाच्या विरोधात केंद्रातील मोदी सरकारमधून राजीनामा देणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला. त्यातच मोदींना मोठा धक्का बसला आहे.

कृषी व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020 वर चर्चेत सहभागी होत सुखबीर बादल म्हणाले की, शिरोमणि अकाली दल शेतकऱ्यांची पार्टी आहे. आणि ती कृषी संबंधित या विधेयकाचा विरोध करते. आम्ही सरकारकडे शेतकऱ्यांचं म्हणणं पोहोचवलं आहे. आम्ही या विषय अनेक व्यासपीठावर उपस्थित केला. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न दूर व्हावेत यासाठी पूर्ण प्रयत्न केला, मात्र असे होऊ शकले नाही.

पंजाबमध्ये सातत्याने सरकारने कृषी आधारभूत रचना तयार करण्यासाठी बरंच काम केलं, मात्र हा अध्यादेश त्यांची 50 वर्षांची तपश्चर्या भंग करेल. अकाली दलाच्या नेत्यांनी लोकसभेत सांगितले की, मी घोषणा करतो की हरसिमरत कौर बादल सरकारमधून राजीनामा देईल. हरसिमरत कौर बादल या मोदी सरकारमध्ये अकाली दलाच्या एकामात्र प्रतिनिधी आहेत. अकाली दल हा भाजपचा सर्वात जुना घटक पक्ष आहे. दुसरीकडे या विधेयकावरुन नवा वाद सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन आपलं मत व्यक्त केलं आहे.बहुमतात असलेल्या भाजपला एनटीएतील घटक पक्षांसोबत समन्वय नसल्याचे पंजाबमधील परिस्थितीवरुन दिसते. घटक पक्षांशी कोणतीही चर्चा न करता शेतकऱ्यांसंबंधातील महत्त्वाचे विधेयक संसदेत कसे मांडू शकतात, हे विधेयक मागे घ्यावे याबाबत घटक पक्षाशी चर्चा करून सहमती तयार करावी, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केलं आहे. पंजाब काँग्रेसनेदेखील या शेती विषयक विधेयकाला विरोध दर्शविला आहे.

शिरुर ताजबंद मराठा समाजाचे घंटानाद आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या