नवी दिल्ली : प्रदीर्घ आजारानंतर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्याचा मुलगा आणि एलजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी या संदर्भात ट्विट केला आहे.
पापा….अब आप इस दुनिया में नहीं हैं लेकिन मुझे पता है आप जहां भी हैं हमेशा मेरे साथ हैं।
Miss you Papa… pic.twitter.com/Qc9wF6Jl6Z— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 8, 2020
चिराग पासवान यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, “पापा …. आता आपण या जगात नाही पण मला माहित आहे आपण जिथे जिथे आहात तिथे नेहमीच माझ्याबरोबर आहात. मिस यू पापा …”
गेल्या अनेक दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र गुरुवारी त्यांचा संघर्ष संपला. मृत्यूसमयी त्यांचे वय ७४ वर्षे होते. दलित परिवारात जन्मलेल्या पासवान यांनी बीए एलएलबीपर्यंत शिक्षण घेतले. पोलिस सेवेत मिळालेल्या नोकरीचा प्रस्ताव धुडकावून त्यांनी राजकारणाचा मार्ग पत्करला. सर्वप्रथम १९६९ साली बिहार विधानपरिषदेवर निवडून आले. प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत आठवेळा लोकसभेवर निवडून गेले. सध्या राज्यसभेचे खासदार होते. दीर्घकाळ ते केंद्रिय मंत्रीमंडळात कार्यरत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातही २०१४ पासून ते आजपर्यंत कॅबिनेटमंत्री होते
केबीसीमध्ये धडक मारणार्या कु. अस्मिता गोरेचा गौरव सोहळा