24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयदेशपातळीवर विरोधी पक्षाचा एकोपा

देशपातळीवर विरोधी पक्षाचा एकोपा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशपातळीवर विरोधी पक्षाचा एकोपा तयार करण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव विरोधकांच्या ऐक्यासाठी आघाडीवर आहेत. त्यातच आता नितीश कुमार यांचे नाव जोडले गेले आहे. नितीश कुमार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली.

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर नितीश म्हणाले की, भाजपवाले संपूर्ण देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकजुट होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहे. पुढील काही दिवसांत तुम्हाला दिसेलच. माझी वैयक्तीक काहीही इच्छा नाही. फक्त एकच सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असून हे देशहितासाठी असेल असेही नितीश यांनी नमूद केले आहे.

तिसरी आघाडी स्थापणार?
याआधी नितीश कुमार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भेट घेतली होती. तसेच दोघांनी एकत्र पत्रकार परिषदही घेतली होती. त्यावेळी केसीआर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते की, लोक आज तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत बोलत आहेत. पण आम्ही तिस-या आघाडीऐवजी मुख्य आघाडी करणार आहोत. सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजप मुक्त भारताचा नारा बळकट करणार आहोत. त्यासाठी विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान आज नितीश यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे भाजपविरोधी पक्ष एकत्र येण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याचे दिसून येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या