22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयछत्तीसगडमध्ये अज्ञात आजाराचे थैमान

छत्तीसगडमध्ये अज्ञात आजाराचे थैमान

एकमत ऑनलाईन

सुकमा : छत्तीसगड जिल्ह्यातील कोन्टा ब्लॉकमधील रेगडगट्टा गावात अज्ञात आजाराने कहर केला आहे. या आजाराने दोन वर्षांत ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. आजही गावातील ४० हून अधिक ग्रामस्थ आजाराच्या विळख्यात आहेत. हे मृत्यू नेमके कशामुळे झाले हे जाणून घेण्यासाठी आता अधिकारी कृतीत उतरले आहेत.

या अज्ञात आजाराने ग्रस्त असलेले काही ग्रामस्थांवर सुकमा शहरातील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. अद्यापपर्यंत आरोग्य विभागाचे पथक अज्ञात आजाराबाबत गंभीर होताना दिसत नाही. त्यामुळे या आजाराबाबत अद्याप कोणतीही माहिती आरोग्य विभागाला मिळू शकलेली नाही. आरोग्य विभागाच्या पथकाने गावक-यांचे नमुने निश्चित घेतले असले तरी चाचणीचे अहवाल आलेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना जिवाची चिंता सतावू लागली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या