25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeराष्ट्रीयअनलॉकमुळे रोजगारात होतेय सातत्याने वाढ

अनलॉकमुळे रोजगारात होतेय सातत्याने वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाउनच्या संकटामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या रोजगारनिर्मितीमध्ये मोठी घट झाली आहे. पण लॉकडाउनमध्ये अनेक उद्योग-व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या नोकºयांवर गदा आली होती. मात्र, आता देशात अनलॉक झाल्याने रोजगारनिर्मितीत वाढ होत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या पॅरोल डेटानुसार नोकºयांमध्ये वाढ होत आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, ईपीएफओमध्ये नवे ग्राहक म्हणजेच नव्या नोकरदारांची संख्या या वर्षी जून महिन्यांत ५.५२ लाख होती. तर जुलै महिन्यांत यात वाढ होऊन ती ६.४८ लाखांवर पोहोचली. आॅगस्टमध्ये पुन्हा एकदा नव्या नोकºयांची भर पडली आणि ईपीएफओशी ६.७ लाख नोकरदार जोडले गेले. मात्र, लॉकडाउन संपल्यामुळे अर्थव्यवस्था खुली झाल्याने नोकºयांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे. गेल्या जून महिन्यात देशात १२.०२ लाख नवी रोजगार निर्मिती झाली होती. मात्र, भारतात यावर्षी कोरोनाविषाणूमुळे मार्चमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. हा लॉकडाउन मेच्या शेवटापर्यंत सुरु होता जो जूनच्या सुरुवातीला काही अटी-शर्तींसह सुरु झाला.

जून महिन्यांत ५़५२ लाख रोजगार निर्मिती
या वर्षी जून महिन्यांत ५.५२ लाख रोजगार निर्मिती झाली. जी गेल्यावर्षीच्या तुलनेत ५४ टक्के कमी होती. याच प्रकारे जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४७ टक्के कमी रोजगार निर्मिती झाली. ऑगस्टमध्ये रोजगार वाढल्यानंतरही गेल्या वर्षी १० लाख नव्या रोजगाराच्या तुलनेत यावेळी ३३ टक्के कमी नोक-यांची निर्मिती झाली.

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा गैरव्यवहार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या