25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeराष्ट्रीयहिमाचलमध्ये विनामास्क थेट तुरुंगवास

हिमाचलमध्ये विनामास्क थेट तुरुंगवास

एकमत ऑनलाईन

सिरमौर : कोरोनाच्या संसर्गाने देशात पुन्हा एकदा उचल धरली आहे. यामागे नागरिक कोविड-१९ च्या प्रोटोकॉलचे पालन करत नसल्याचे प्रमुख कारण आहे. कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरणे ही प्राथमिक खबरदारी असतानाही लोक याकडेही दुर्लक्ष करत आहेत.

वारंवार जनजागृती करुनही या नियमाचा भंग होत असल्याने आता हिमाचल प्रदेश या राज्याने याविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, जर कोणी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास त्याला थेट अटक करण्याचे आदेश सरकारने पोलिसांना दिले आहेत.

कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास तिला कुठल्याही वॉरंटशिवाय अटक करण्यात येईल, तसेच या गुन्ह्याबद्दल आठ दिवसांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल किंवा ५००० रुपयांचा दंड आकारण्यात येईल, अशी माहिती सिरमौरच्या पोलिस अधीक्षकांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या