26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयअसंसदीय शब्दांची नियमावली जाहीर

असंसदीय शब्दांची नियमावली जाहीर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आता संसदेच्या कामकाजादरम्यान जर एखाद्या खासदाराने सरकार ‘हुकूमशहा’ झाले किंवा विरोधक ‘हुकूमशाही’ करत आहेत अशा शब्दांचा उल्लेख केल्यास हे शब्द संसदेच्या नवीन नियमांनुसार असंसदीय मानले जातील.

तसेच ते संसदेच्या कामकाजातून काढून टाकले जाईल. एवढेच नाही तर आता संसदेत जयचंद, विनाश पुरुष, खलिस्तानी, जुमलाजीवी या शब्दाचा उच्चार देखील असंसदीय मानला जाणार आहे.

लोकसभा आणि राज्यसभेच्या १८ जुलैपासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनात हा नियम लागू केला जाणार आहे. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या नवीन पुस्तिकेत म्हटले की, जुमलाजीवी, चाइल्ड विजडम, कोविड स्प्रेडर आणि स्रूपगेट असे शब्द लोकसभेत आणि राज्यसभेत असंसदीय मानले जातील.

याचप्रमाणे शरमदार, अब्यूज्ड, बेट्रेड, भ्रष्ट, नाटक, ढोंगी आणि अकार्यक्षम या इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा समावेश आहे. जे शब्द संसदेत सरकारवर टीका करण्यासाठी वापरले जातात, उदा. दुटप्पी, निरुपयोगी, नौटंकी, ढोल बडवणारे, बहिरे सरकार, हिंदीतील गद्दार, गिरगिट, घड़ीयाली आंसू, अपमान, असत्य, अहंकार, करप्ट, काला दिन, काला बाजारी आणि खरीद फरोख्त शब्द देखील असंसदीय मानले जाणार आहे. या अनुषंगाने विरोधकांनी टीका केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या