22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीय..तोपर्यंत मल्ल्याचे प्रर्त्यपण नाहीच

..तोपर्यंत मल्ल्याचे प्रर्त्यपण नाहीच

इंग्लंडची स्पष्टोक्ती ; गोपनीय खटल्यातील चौकशी कधी संपेल सांगणे मुश्किल

एकमत ऑनलाईन

लंडन : भारतात मनीलॉंड्रिंग प्रकरणी वॉन्टेड असलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याचे भारताकडे लवकर प्रत्यार्पण शक्य नसल्याची स्पष्टोक्ती इंग्लंडच्यावतीने करण्यात आली आहे. एका गोपनीय प्रकरणात इंग्लंडमध्ये मल्ल्याची चौकशी सुरु असून ती पुर्ण झाल्यानंतरच मल्ल्याला भारताकडे सोपवू असे इंग्लंडकडून सांगण्यात आले आहे. परिणामी मल्ल्याला भारतात आणण्याच्या मनसुब्यांवर तुर्तासतरी पाणी फिरले आहे.

इंग्लंडच्या कार्यकारी उच्चायुक्त जॅन थॉम्पसन यांनी याबाबत ऑनलाईन वार्तालापात खुलासा केला. मल्ल्याला भारताकडे सुपूर्द करण्यापुर्वी त्याच्यावर इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या खटल्यातील सुनावणी पुर्ण होणे आवश्यक आहे. ही सुनावणी कधीपर्यंत पुर्ण होईल हे सांगणेही मुश्किल आहे. जोपर्यंत ही सुनावणी पुर्ण होऊन निकाल मिळत नाही तोपर्यंत प्रत्यार्पण अशक्य आहे, असे थॉम्पसन यांनी सांगितले. तसेच ही सुनावणी नक्की कोणत्या प्रकरणात आहे याबाबतही सांगण्यास त्यांनी नकार दिला. मात्र ही सुनावणी लवकरात लवकर पुर्ण करण्याबाबत इंग्लंड प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

मल्ल्याची इंग्लंडच्या कोर्टाकडूनही निराशा
मद्यसम्राट विजय मल्ल्या हा मनी लॉड्रिंग व हजारो कोटींच्या घोटाळ्याबाबत भारत सरकारला हवा आहे. मोदी सरकारच्या मागील कार्यकाळात तो इंग्लंडमध्ये पळून गेला होता. भारताने इंग्लंड सरकारकडे त्याच्या प्रर्त्यापणाची मागणी केली होती. मल्ल्याने याविरोधात इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली होती. तेव्हापासून भारताकडून मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत इंग्लंड सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र अद्यापही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.

लिफाफे, मतपेटी निवडणूकीचा आत्मा असल्याने अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या