25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeराष्ट्रीययूपीत लव्ह जिहादविरुध्द कायदा लागू

यूपीत लव्ह जिहादविरुध्द कायदा लागू

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तर प्रदेशातील योगी सरकारने लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतराविरोधी अध्यादेशाचा मसूदा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे अनुमोदनासाठी बुधवारी राजभवनात पाठवला होता. या अध्यादेशावर शनिवारी राज्यपालांनी स्वाक्षरी करत मंजुरी दिली. त्यामुळे आजपासून उत्तर प्रदेशात हे दोन्ही कायदे लागू झाले आहेत. त्यानंतर आता हे अध्यादेशाला सहा महिन्यांमध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करावे लागतील. त्यानंतरच ते कायमस्वरुपी लागू होतील.

खोटे बोलून, फसवून किंवा कट-कारस्थान करुन धर्मांतर करण्याला प्रतिबंध घालण्यासाठी योगी सरकारने हे अध्यादेश काढले आहेत. हा कायदा लागू झाल्यानंतर याचे उल्लंघन करणा-यांविरोधात सरकारला कडक कारवाई करता येणार आहे. केवळ लग्नासाठीच जर मुलीचे धर्मांतर करण्यात आले़ तर असे लग्न केवळ अमान्य घोषित करण्यात येईल़ तर धर्मांतर करणाºयांना १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर हा कायदा लागू झाला आहे.

या कायद्यानुसार घडलेला गुन्हा हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. या कायद्यानुसार, केवळ लग्नाच्या हेतूने जर एका धर्मातून दुस-या धर्मात जर मुलीचे धर्मांतर करण्यात आले़ तर ते लग्न अमान्य केले जाईल. तसेच एका धर्मातून मुक्त होत दुसरा धर्म स्विकारायचा असेल तर संबंधित अधिका-यासमोर त्यांना घोषणा करावी लागेल की हे पूर्णत: स्वेच्छेने होत आहे. संबंधित लोकांना हे सांगावे लागेल की त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे प्रलोभन किंवा दबाव टाकलेला नाही.

हिमाचलमध्ये विनामास्क थेट तुरुंगवास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या