21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीययूपीएससीच्या परीक्षार्थींना पुन्हा संधी नाही

यूपीएससीच्या परीक्षार्थींना पुन्हा संधी नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे ज्या विद्यार्थ्यांची यूपीएससी परीक्षा चुकली होती, अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. गतवर्षीच्या आॅक्टोबर महिन्यात यूपीएससीची परीक्षा घेण्यात आली होती. तथापि कोरोना संकट आणि लॉकडाउनमुळे असंख्य विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करता आली नव्हती. तसेच कित्येक विद्यार्थ्यांची परीक्षा चुकली होती.

विद्यार्थ्यांना एक संधी देत पुन्हा परीक्षेचे आयोजन केले जावे, अशा आशयाच्या असंख्य याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. याचिका दाखल केलेल्यांमध्ये कोरोना संकटाविरोधात लढा देत असलेल्या काही कोरोना वॉरियर्सचाही समावेश होता. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा व न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिला. ज्या विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती, त्यात वयाची मर्यादा संपत असलेल्या आणि किमान परीक्षेची अट पूर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

परीक्षा पुन्हा घेण्यास सरकारचा विरोध
यूपीएससीची परीक्षा पुन्हा घेण्यास केंद्र सरकारने सुरुवातीपासून न्यायालयात विरोध केला होता, मात्र सुनावणीच्या अखेरच्या टप्प्यात परीक्षा घेण्यास केंद्राने अनुकूलता दर्शवली होती. सर्वसाधारण श्रेणीतील विद्यार्थ्यांना ३२ वर्षे वयापर्यंत सहावेळा यूपीएससी परीक्षा देता येते. ओबीसी श्रेणीतील विद्यार्थ्यांना ३५ वर्षे वयापर्यंत ९ वेळा यूपीएससी परीक्षा देता येते. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना वयाच्या ३७ व्या वर्षापर्यंत कितीही वेळा ही परीक्षा देता येते.

एक मार्चपासून सर्वसामान्यांना कोरोना लस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या