वॉशिंग्टन : लडाखमध्ये भारत-चीनमध्ये लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या हिंसक संघर्षानंतर ही शस्त्र विक्री-खरेदी महत्त्वपूर्ण समजली जात असून, भारताने दिलेल्या शस्त्र खरेदी प्रस्तावाला अमेरिकेने हिरवी झेंडी दिली असून, खरेदी संदर्भातील नियमांमध्येही अमेरिकेने बदल केला असल्याने लवकरच भारताला घातक एमक्यू-१ प्रीडेटर ड्रोन सशस्त्र ड्रोन मिळणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका भारताला अधिकाधिक शस्त्रे विकण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा करण्यात येत आहे. माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, अमेरिकेकडून भारताला विक्री करण्यात येणाºया शस्त्रांमध्ये सशस्त्र ड्रोनचा समावेश आहे.
भारत-चीनमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात २० जवान शहीद झाले होते. त्याशिवाय काही चिनी सैनिकही ठार झाल्याचे वृत्त होते. मात्र, त्याला चीनने कोणताही अधिकृत दुजोरा दिला नाही. तर, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, चीनचे ३५ सैन्य ठार झाले होते. फॉरेन पॉलिसी या नियतकालिकेने अमेरिकन अधिकारी आणि संसदीय सदस्यांच्या मुलाखतीच्या आधारे एक वृत्त दिले आहे. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाचे भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या तणावावर लक्ष आहे. अमेरिका भारताला या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला शस्त्र विक्री वाढवण्याचा विचार करणार आहे. जेणेकरून वॉशिंग्टन आणि बीजिंगमधील तणाव आणखी वाढेल, असा दावा करण्यात आला आहे.
या वृत्तानुसार, अमेरिकेला या नियम सुधारणामुळे भारताला सशस्त्र ड्रोन विक्री करण्याचा निर्णय घेता येणार आहे. एका अधिकाºयाने सांगितले की, भारताला सशस्त्र(श्रेणी-१) प्रीडेटर्स देण्यात येणार आहे. एमक्यू-१ प्रीडेटर ड्रोन हे सशस्त्र ड्रोन आहे. या ड्रोनद्वारे एक हजार पौंड वजनाचे बॉम्ब, क्षेपणास्त्र डागता येऊ शकतात.
भारतासाठी अमेरिकेने केली नियमांत सुधारणा
नियतकालिकेने अधिका-यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारताला नवीन शस्त्र विक्री करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. यामध्ये सशस्त्र ड्रोनसारख्या उच्चस्तरीय शस्त्र प्रणाली तंत्रज्ञान असणार आहे. भारताला सैन्य स्तरावर ड्रोन विक्री करता येऊ शकेल, यासाठी अमेरिकेने आपल्या नियमात सुधारणा केली आहे. जुन्या नियमांनुसार भारताला सशस्त्र ड्रोन विक्री करता येऊ शकत नव्हती.
२० अब्ज डॉलर किंमतीचे शस्त्र
भारत आणि अमेरिकेतील संरक्षण खरेदी २००८ मध्ये नगण्य स्तरावर होती. मात्र, या वर्षी शस्त्र खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, २० अब्ज डॉलर किंमतीचे शस्त्र भारताने अमेरिकेकडून खरेदी केले आहेत. यामध्ये एमएच-६०आर सीहॉक हेलिकॉप्टर (२.८ अब्ज डॉलर). अॅपाचे हेलिकॉप्टर (७९६ दशलक्ष डॉलर) आदी करारांचा समावेश आहे. अमेरिकेने २०१६ मध्ये भारताला संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा भागिदार म्हणून दर्जा दिला. त्यानंतर २०१८ पासून अमेरिकेकडून भारताला अनेक महत्त्वाची शस्त्र खरेदी करता येणार आहे.