19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeराष्ट्रीयलडाख सीमेवर चीनचे ६० हजार सैन्य - अमेरिकेचा दावा

लडाख सीमेवर चीनचे ६० हजार सैन्य – अमेरिकेचा दावा

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : चीनने लडाख सीमेवर ६० हजार सैन्य तैनात केले असल्याचा दावा अमेरिकेने केला असून, चीनविरोधातील लढाईत भारताला अमेरिकेच्या मदतीची गरज असल्याचे म्हटले आहे.

भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव अद्यापही पूर्णपणे कमी झालेला नाही. दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी चीन क्वाड देशांसाठी (अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान) धोका असल्याचे म्हटले आहे. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची मंगळवारी टोकियोमध्ये बैठक पार पडली. कोरोनानंतर पहिल्यांदाच समोरासमोर पार पडलेल्या या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीतून परतल्यानंतर माइक पोम्पिओ यांनी तीन मुलाखती दिल्या. या मुलाखतींमध्ये त्यांनी चीनकडून असणारे धोके तसेच, नियमांचे उल्लंघन यावर भाष्य केले.

भारत, ऑस्ट्रेलिया, जपान यांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत मी होतो चार सर्वात मोठ्या लोकशाही, चार शक्तिशाली अर्थव्यवस्था, चार देश प्रत्येक देशाला चिनी कम्युनिस्ट पार्टीकडून धोका आहे. याचा जाणीव त्यांना आपल्या देशातही होत आहे, असे माइक पोम्पिओ यांनी द गाय बेनसन कार्यक्रमात सांगितले.

भारतीय सैनिक लढा देतायेत
पुढे ते म्हणाले की, प्रत्येकाला याची जाणीव आहे. मग ते भारतीय असोत ज्यांना हिमालयात सैन्यासोबत लढा द्यावा लागत आहे. चीनने लडाखमध्ये आता मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे.

चीनला रोखण्यासाठी क्वाड देश सज्ज
चीनला रोखण्यासाठी क्वाड देश धोरण आखत असल्याची माहिती माइक पोम्पिओ यांनी दिली आहे. तसेच, भारताला चीनविरोधात लढा देताना नक्कीच अमेरिकेची साथ मिळणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

लष्कराने पाकचा डाव उधळला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या