27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयउत्तर प्रदेश : अत्याचारातील गुन्हेगाराला जामीन नाही

उत्तर प्रदेश : अत्याचारातील गुन्हेगाराला जामीन नाही

एकमत ऑनलाईन

लखनौ : महिला अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अधिकाधिक कठोर कायदे तयार करण्यावर उत्तर प्रदेश सरकार भर देत आहे. त्यानुसार आता योगी सरकारनें विधानसभेत नवे विधेयक मंजूर केले आहे. या नव्या विधेयकानुसार महिला अत्याचारातील गुन्हेगारांना जामीनच मिळणार नाही. हे विधेयक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुढाकाराने विधानसभेत मांडण्यात आले. यामध्ये अत्यंत वाईट प्रकारे महिला अत्याचाराची घटना घडल्यास अशा गुन्हेगारांना जामीन मिळणार नाही. या विधेयकामुळे यापूर्वीच्या सीआरपीसी कायद्यात बदल होणार आहे.

बलात्कार, सामूहिक बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना जामीन मिळणार नाही. तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यासही जामीन मिळणार नाही, अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. अलिकडे महिला अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कायदे कठोर करण्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेशातील योगी सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. यातून गुन्हेगारांवर जरब बसण्यास मदत होईल, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या