26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयउत्तराखंड सरकारच्या नोकरभरतीत घोटाळा?

उत्तराखंड सरकारच्या नोकरभरतीत घोटाळा?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देवभूमी उत्तराखंडमध्ये पुष्करसिंग धामी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला दुस-या कार्यकाळातील जेमतेम सहा महिने उलटले नाहीत तोच नोकरी भरती घोटाळ्याने सत्ताधारी पक्षाला धक्का बसला आहे. सरकारी नोक-या देताना सत्तारुढ भाजप नेत्यांच्या नातेवाईकांनी ‘मिल बांट के खाओ‘ चे धोरण अंमलात आणल्याचा ठपका आहे. उत्तराखंडमधून लोकसभेच्या ५ जागांचे लोणी नियमित मिळविणा-या भाजप नेतृत्वाला २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताज्या घोटाळ्यांची व सत्तारूढ घोटाळेबाजांची दखल घेणे भाग पडणार आहे.

उत्तराखंड सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन कमिशन (यूकेएसएसएससी) पेपरफुटी घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी हुकुम सिंग यांचे सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांशी असलेले कनेक्शन उघड झाल्यानंतर भाजपसमोरील पेच वाढला. त्यापाठोपाठ नोकरभरती घोटाळा बाहेर आला आहे. सरकारी भरतीतील अनियमिततेची कठोर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत असे आश्वासन धामी यांनी वारंवार दिल्यानंतरही भाजपविरूध्दचा विशएषत: तरूणांमधील रोष अजिबात कमी झालेला नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या