24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeराष्ट्रीयकेंद्रात येता न येणा-यांना घरातच लस

केंद्रात येता न येणा-यांना घरातच लस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने घरोघरी लसीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. लस घेण्यासाठी जे केंद्रात जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही घरीच लसीकरण सुरू करत आहोत. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या लसीकरणातही सर्व नियमांचे पालन केले जाईल, असे पॉल यांनी स्पष्ट केले. दिव्यांगांना आणि जे लोक घरीच असून चालू फिरू शकत नाहीत, त्यांचे घरीच लसीकरण केले जाणार आहे.

देशात सलग १२ व्या आठवड्यात करोना संसर्गाचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा कमी आहे. हा दर ३ टक्क्यांहूनही कमी आहे. देशात कोरोना संसर्गातून बरे होण्याचा दर हा ९७.८ टक्क्यांवर गेला आहे. काही राज्यांमध्ये लसीकरणावर प्रचंड काम झाले आहे. यामुळे १८ वर्षांवरील लोकसंख्येपैकी ६६ टक्के नागरिकांना कोरोनाचा लसीचा किमान एक तरी डोस मिळाला आहे. २३ टक्के नागरिकांना कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.

देशातील ६ राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या १०० टक्के लोकसंख्येला लसीचा पहिला डोस दिला आहे. यामध्ये लक्षद्वीप, चंदिगड, गोवा, हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे आणि सिक्कीम यांचा समावेश आहे. देशातील ४ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला पहिला डोस दिला गेला आहे. यामध्ये दादरा-नगर हवेली, केरळ, लडाख आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या झाली कमी
देशातील कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या देशात सध्या ३ लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी १ लाखांहून अधिक केरळमध्ये आणि ४० हजारांहून अधिक महाराष्ट्रात आहेत, असं राजेश भूषण म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या