32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeराष्ट्रीयसर्वसामान्यांना २०२२ नंतरच लस?

सर्वसामान्यांना २०२२ नंतरच लस?

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचे संकेत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : लस आणि देशातील एकूण परिस्थिती पाहता सर्वसामान्यांना लसीचा डोस पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्येच मिळणार असल्याचे संकेत एम्सचे संचालक आणि नॅशनल टास्क फोर्सचे डॉ़ रणदिप गुलेरिया यांनी रविवार दि़ ८ नोव्हेंबर रोजी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिले आहेत.

देशातील कोरोनाची भीती अद्यापही कमी झालेली नाही. राजधानी दिल्लीत तिसरी लाट सुरू आहे. त्याचबरोबर सण उत्सवाच्या काळात आणखी कोरोनाची लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आले असून, सगळ्यांच्याच नजरा सध्या कोरोना लसीकडे लागल्या आहेत. मात्र, सर्वसामान्यांना कोरोना लवकर मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याचे संकेत दिले आहेत.

डॉ. गुलेरिया यांनी कोरोना परिस्थिती व लसीबाबत भाष्य केले. एम्सच्या संचालक असण्याबरोबरच कोरोना व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्सचे गुलेरिया हे सदस्य आहेत. डॉ. गुलेरिया म्हणाले, सध्या तरी कोरोना विषाणू संपणार नाही. भारतात कोरोनावरील लस येण्यासाठी अजून एक वर्ष तरी लागू शकते. भारतातील लोकसंख्या खूप जास्त आहे. ज्याप्रमाणे इतर आजारांवरील लसींप्रमाणेच कोरोनाची लस सहज उपलब्ध होण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे सामान्य लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचण्यासाठी एक वर्षांपेक्षा अधिक काळ लागणार आहे, असे गुलेरिया म्हणाले.

लस आल्यानंतरची देशासमोरील आव्हाने
कोरोना लस आल्यानंतर देशासमोर कोणते आव्हान असणार आहे? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना गुलेरिया म्हणाले, लसींच्या वितरणाला आमची प्राथमिकता असेल, कारण देशातील सर्वच भागात लस पोहोचायला हवी. कोल्ड चेन सांभाळून पुरेशा प्रमाणात इंजेक्शनही देशातील सर्वच भागात पोहोचवणं आमच्यासमोर महत्त्वाचं आव्हान आहे, असे गुलेरिया यांनी सांगितले.

लसीचे नियोजन एकाच वेळी
पहिल्या टप्प्यातील लसीनंतर दुस-या टप्प्यात येणारी लस अधिक प्रभावी असेल. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील लसीचे काय करायचे? त्यानंतर आम्हाला ठरवावे लागणार आहे की, कुणाला पहिल्या टप्प्यातील लस द्यायची आणि कुणाला दुस-या टप्प्यातील लस द्यायची. खूप सारे निर्णय एकाच वेळी घेण्याची गरज असेल, असे गुलेरिया म्हणाले.

तळोजा कारागृहात गोस्वामींची रवानगी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या