21.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home राष्ट्रीय देशात जानेवारीपासून लसीकरण; पुनावालाकडून देशाला खुशखबर

देशात जानेवारीपासून लसीकरण; पुनावालाकडून देशाला खुशखबर

एकमत ऑनलाईन

पुणे : कोरोनाची लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. लस उत्पादक कंपन्यादेखील लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. इंग्लंडमध्ये कोरोना लशीचा आपत्कालीन वापर सुरू झाल्यानंतर भारतातही तीन औषध कंपन्यांनी आपल्या कोरोना लशीला आपात्कालीन मंजुरी मिळावी यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. सीरमने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्राझेनका कंपनीसह मिळून ही लस तयार केली आहे. लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी द्यावी यासाठी ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे अर्ज केला आहे. याच वर्षाच्या अखेरपर्यंत ही मंजुरी मिळेल आणि पुढील वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोरोना लशीकरण सुरू होईल, अशी खूशखबर अदर पूनावाला यांनी दिली आहे.

सरकारी, तसंच खासगी क्षेत्रालाही पुरतील एवढ्या डोसची निर्मिती करण्याची तयारी सीरम इन्स्टिट्यूट करत असल्याचं पूनावालांनी स्पष्ट केलं. तसंच, कोविड-१९ लसीच्या निर्मितीसाठी नोव्हावॅक्स कंपनीसोबत करार केल्याचंही त्यांनी सांगितले. २०२१ च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत नोव्हाव्हॅक्सच्या तिस-या टप्प्यातल्या चाचण्या पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने विकसित केलेली कोरोना प्रतिबंधक लस तातडीने वापरण्याची परवानगी डिसेंबरअखेरपर्यंत मिळण्याबद्दल संस्थेचे सीईओ आदर पूनावाला आशावादी आहेत. आम्हाला इमर्जन्सी लायसेन्स चालू महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल; पण लसीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठीची परवानगी नंतर मिळेल. नियंत्रक यंत्रणेची परवानगी मिळाली, तर भारताचा कोरोना लशीकरण कार्यक्रम जानेवारी २०२१ मध्ये सुरू होऊ शकतो, असा विश्वास आम्हाला आहे, असे पूनावाला यांनी सांगितले.

सुरुवातीला देशाच्या किमान २० ते ३० टक्के लोकसंख्येला लस देण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्रालय नियोजन करत आहे. तेवढा टप्पा पार पडल्यावर आपल्याला समाजात आत्मविश्वास दिसू लागेल, असे पूनावाला यांनी म्हटले आहे. सरकारला जुलै २०२१ पर्यंत लसीचे ३० ते ४० कोटी डोस हवे असल्याचंही पूनावाला यांनी नमूद केले आहे़

 

उत्तर प्रदेशात बसपा व एमआयएम युतीसाठी प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या