लखनौ : कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात करणारे उत्तर प्रदेश (यूपी) हे देशातील पहिले राज्य ठरणार असून, त्यादृष्टीने उत्तर प्रदेशात हालचालींना वेग आला आहे़ राज्यातील सर्व सरकारी कर्मचा-यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
उत्तर प्रदेशच्या कुटुंब कल्याण विभागाकडून यासंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये २० डिसेंबर ते २१ जानेवारी या काळात लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्याचा उल्लेख आहे. यासाठी सरकारी कर्मचा-यांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे पूर्ण विचाराअंती सर्व सरकारी कर्मचा-यांच्या सुट्या ३१ जानेवारीपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.
विरोधकांकडून शेतक-यांना भडकवण्याचे काम