22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयआधारकार्डशिवायही लसीकरण शक्य

आधारकार्डशिवायही लसीकरण शक्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाची लस घेण्यासाठी गेलेल्या अनेकजणांना केवळ आधारकार्ड नसल्यानेच लसीकरणापासून वंचित ठेवण्याचे प्रकार घडले आहेत. त्यावरुन यूआयडीएआयने स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आधारकार्डाची सक्ती बंधनकारक नसल्याचे यूआयडीएआय कडून स्पष्ट करण्यात आले आहे. आधारकार्ड नसेल तर कोणत्याही रुग्णाला औषध, रुग्णालयात दाखल करुन घेणे किंवा उपचार करण्यासंबंधित नकार देता येणार नाही, असेही यूआयडीएआयने सांगितले आहे.

आधार कार्डसाठी एक्सेप्शन हँडलिंग मॅकेनिज्म (ईएचएम) स्थापित केले आहे. १२ अंकाच्या बायोमॅट्रिक आयडीच्या अभावात सुविधा आणि सर्विसची डिलिव्हरी ठरवण्यासाठी याचे पालन केले पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे आधारकार्ड नसेल तर त्याला गरजेचे सामान देण्यापासून रोखता येणार नाही. आधार कार्डाशिवाय सुद्धा महत्वाचे काम आणि सुविधेचा वापर केला जाऊ शकतो, असे यूआयडीएआयकडून सांगण्यात आले आहे.

आधार अधिनियमांनुसार सेवा देणे बंधनकारक
देशात कोरोना महारोगराईच्या महासंकटात युआयडीएआयचा दिलेला निर्वाळा महत्त्वपुर्ण ठरणार आहे. एखाद्याकडे आधार कार्ड नसल्यास अथवा कोणत्या कारणास्तव आधार ऑनलाईन वेरिफिकेशन यशस्वी न झाल्यास या संबंधित एजेंसी विभागाला आधार अधिनियम, २०१६ मधील निर्धारित विशिष्ट मानदंडानुसार सेवा द्यावी लागेल, असे आधार कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

देशातील सर्वात मोठी ऑनलाईन बैठक संपन्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या