22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीय११४ दिवसांत १७ कोटी नागरिकांचे लसीकरण

११४ दिवसांत १७ कोटी नागरिकांचे लसीकरण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोना लसींची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी देशात आतापर्यंत १७ कोटींपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ११४ दिवसांत १७ कोटी नागरिकांचे लसीकरण करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेमुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यानंतर कोरोनाविरोधातील लसींची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.

मात्र वाढत्या मागणीच्या तुलनेत लसींचा पुरवठा कमी होत असला तरी लसीकरणात भारताने अव्वल स्थान काबीज करून बाजी मारली आहे़ १७ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी चीनला ११९ दिवस तर अमेरिकेला १५५ दिवस लागले. भारतामध्ये १६ जानेवारी रोजी लसीकरणाची सुरुवात झाली होती. सुरुवातीला आरोग्यसेवेतील कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ६० वर्षांवरील नागरिक, ४५ वर्षांवरील नागरिक आणि आता १८ ते ४४ वर्षांवरील नागरिक यांच्या लसीकरणाला टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत एकूण १७ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

लसीकरणाची गती वाढतेय
आज सकाळी ७ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण १७ कोटी, १ लाख, ७६ हजार ६०३ जाणांचे लसीकरण झाले आहे. देशातील एकूण लसीकरणापैकी ६६.७९ टक्के लसीकरण हे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये झाले आहे.

जंबो कोविड सेंटरमध्ये पडद्यावर पाहायला मिळणार योगासन, रामायण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या