23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeराष्ट्रीयदोन वर्षांच्या चिमुकल्यावर लसीची चाचणी

दोन वर्षांच्या चिमुकल्यावर लसीची चाचणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी सर्वाधिक धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आधीच तयारी सुरू केली आहे. २ वर्षाच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी ट्रायल करण्यात आली आहे. आतापर्यंत जगात इतक्या छोट्या वयातील मुलावर कोरोना चाचणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मुलांना तीन गटात विभागणी केली आहे. ज्याचे सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले आहेत.

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनची या मुलांवर चाचणी करण्यात येत आहे. कानपूरच्या प्रखर हॉस्पिटलमध्ये मंगळवारपासून ही चाचणी करण्यात येत आहे. लसीची चाचणी करण्यासाठी तीन गटात मुलांना विभागण्यात आले आहे. पहिल्या गटात २-६ वयोगटातील मुले. दुस-या गटात ६ ते १२ वयोगट तर तिस-या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला आहे.

अशी झाली लसीची चाचणी
लसीची चाचणी करण्यापूर्वी पहिल्या दिवशी १२ ते १८ वयोगटातील ४० मुलांचे स्क्रिनिंग करण्यात आले. ज्यात २० मुले लसीसाठी तंदरुस्त असल्याचे आढळले. त्या मुलांना लसीचा डोस दिला. बुधवारी ६ ते १२ वयोगटातील १० मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

पात्र मुलांमध्ये सौम्य लक्षणे
लसीकरणासाठी ५ मुले पात्र असल्याचे समोर आले. त्या मुलांनाही लसीचा डोस दिला गेला. त्यानंतर या मुलांना ४५ मिनिटे देखरेखीखाली ठेवण्यात आले. ज्यातील २ मुलांमध्ये इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी सौम्य लाल खूणा दिसून आल्या जी सामान्य मानले जाते़

लहान वयोगटातील जगातील पहिलीच चाचणी
लसीच्या चाचणीचे मुख्य संशोधक बालरोग तज्ज्ञ प्रोफेसर वीएन त्रिपाठी म्हणाले की, २ वर्षाच्या मुलांवर कोरोना चाचणी करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. इतक्या छोट्या वयोगटातील मुलांवर कोरोना लसीची चाचणी कुठेच झाली नाही. आता २ वर्षाच्या मुलावर कोरोना लसीची चाचणी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कानपूरमध्ये आतापर्यंत मोठ्या व्यक्तींवर कोरोना चाचणी झाली होती.

व्हाईट फंगस तयार करतोय ‘लंग बॉल’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या