नवी दिल्ली : भारतात सध्यातरी फक्त १८ वर्षांवरील वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. मात्र, लहान मुलांच्या कोरोना लसींसंदर्भात काहीही ठोस निर्णय घेण्यात आला नाही आहे. मात्र, आता लहान मुलांच्या कोरोना लसींसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, देशात लहान मुलांसाठी बनवल्या जात असलेल्या भारत बायोटेक कंपनीची कोरोना लस कोव्हॅक्सिनची चाचणी सध्या सुरु आहे.
एम्स प्रमुखांच्या सांगण्यानुसार, लहान मुलांसाठीच्या या कोरोना लसींच्या चाचणीचे निष्कर्ष सप्टेंबरपर्यंत येण्याची आशा आहे. डॉ. गुलेरिया यांनी आज शनिवारी म्हटले आहे की, लहान मुलासांठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची चाचणी सध्या सुरु आहे आणि त्याचे निष्कर्ष सप्टेंबरपर्यंत येण्याची आशा आहे.
कमी संक्रमणाच्या ठिकाणी उघडू शकतो शाळा
डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे की, ज्या ठिकाणी संक्रमणाचा दर कमी आहे, त्या ठिकाणी संपूर्ण काळजी घेत शाळा उघडल्या जाऊ शकतात. महासंकटाच्या या काळात कंम्प्यूटर आणि मोबाईल उपलब्ध नसल्याने अनेक मुलांना शाळा सोडावी लागली आहे.
झायडस कॅडिलाच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण
झायडस कॅडिलाने १२ ते १८ वर्षांच्या मुलांसाठीच्या लसींची चाचणी पूर्ण केली आहे. मात्र, एम्सकडून आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळण्यासाठी आणखी काही दिवस लागतील.
देशात ३९,०९७ आढळले, उपचाराधीन रुग्ण वाढले