26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयलहान मुलांची लसही लवकरच होणार उपलब्ध

लहान मुलांची लसही लवकरच होणार उपलब्ध

एकमत ऑनलाईन

पुणे : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेली लहान मुलांची लस अखेर बाजारात उपलब्ध होण्याची वेळ जवळ आली आहे. लहान मुलांसाठी तयार केलेली कोवोव्हॅक्स ही लस फेब्रुवारी महिन्यात बाजारात उपलब्ध होऊ शकेल, अशी घोषणा सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड लसीच्या संशोधन आणि वितरणावर १० हजार कोटींचा खर्च केला असून लहान मुलांसाठीची ही लस मान्यतेच्या अखेरच्या टप्प्यावर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या लसीसाठी आपण अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीसोबत करार केला असून नेमकी कुठली लस कितपत प्रभावी ठरेल, हे अगोदर सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले. इतर लस उत्पादकांसोबतही आम्ही बोलत असून या लसींचे पॅकिंग आणि उत्पादन यासाठी काही ठिकाणी बोलणी सुरू असल्याचे ते म्हणाले. लहान मुलांसाठी लस तयार करणे, ही अत्यंत आव्हानात्मक गोष्ट असल्याचे पूनावाला यांनी म्हटले आहे. देशातील वेगवेगळ््या भागात लहान मुलांवर या लसीचे प्रयोग करण्यात आले असून त्याचे निष्कर्ष आणि नमुने जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठवण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतर ही लस जगभर उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

दरम्यान, नुकतेच भारत सरकारनेदेखील लसींच्या निर्यातीला सुरुवात करणार असल्याचे संकेत दिले आहेत. भारतातील लसीकरणाने नुकताच १०० कोटींचा आकडा पार केला आहे आणि भारत सरकारने सीरम इन्स्टिट्यूटकडे दरमहा २० कोटी लसींची आगाऊ मागणी नोंदवली आहे. त्यामुळे भारतीयांची गरज पूर्ण झाल्यानंतर आता लसींच्या निर्यातीला सुरुवात होणार आहे, असेही ते म्हणाले.

भारताने अद्याप लसीची मागणी नोंदवली नाही
भारत सरकारने अद्याप या लसीसाठीची मागणी आपल्याकडे नोंदवली नसल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने मागणी नोंदविल्यानंतर याचे उत्पादन अधिक मोठ्या प्रमाणात केले जाईल, असेही ते म्हणाले.

लसीच्या निर्यातीसाठी हवी परवानगी
भारतात लसीकरणाचा तुटवडा असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारने लसींच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे जगभरातील अनेक कंपन्यांसोबत केलेले करार पूर्ण करणे शक्य होत नसल्याचे पूनावाला यांनी म्हटले आहे. भारताने लसींची निर्यात करण्याची परवानगी आपल्याला द्यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

पुनावाला यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक
देशातील कोरोना लसीकरणाचा आकडा १०० कोटींवर पोहोचला आहे. याबद्दल सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी आनंद व्यक्त केला आहे. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दूरदृष्टीला जाते, असे पुनावाला म्हणाले. याचवेळी ज्यांनी आपला नंबर येऊनही दुसरा डोस घेतला नाही, अशा लोकांवरही नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आगामी काळात लहान मुलांचीही लस उपलब्ध होणार आहे. लहान मुलांनीही डोस घेऊन कोरोनाचा नायनाट करण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या