30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयइंग्लंड, अमेरिका, जपानच्या लसींना भारतात मंजुरीची गरज नाही

इंग्लंड, अमेरिका, जपानच्या लसींना भारतात मंजुरीची गरज नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाने देशात थैमान घातले असतानाच केंद्रातील मोदी सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यातच, इंग्लंड, अमेरिका, जपान आणि डब्ल्यूएचओने ज्या कोरोना लसींना मंजुरी दिली आहे, त्या लसींना भारतात मंजुरी घेण्याची आवश्यकता नसेल, तसेच याचा परिणाम मे महिन्यापासून दिसायला सुरुवात होईल. असा विश्वास केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी दिला आहे.

एका मुलाखतीदरम्यान सोमवार दि़ १९ एप्रिल रोजी शाह म्हणाले की, कोरोनाच्या नव्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. जगात जेथे-जेथे दुसरी अथवा तिसरी लाट आली, ती पहिल्या लाटेच्या तुलनेत अडीच ते तीन पट अधिक तीव्र्र आहे. यात जो नवा व्हायरस बनला आहे, तो कमी घात आहे, मात्र अधिक वेगाने पसरतो. कोरोनाच्या या नव्या व्हायरसवर वैज्ञानिक वेगाने काम करत आहेत. लसींसंदर्भात बोलताना शाह म्हणाले, यूएस, यूके, जपान आणि डब्ल्यूएचओने ज्या लसींना मान्यता दिली आहे, त्या लसी लवकरच भारतात उपलब्ध होतील. आम्ही लसीकरणाची सुविधाही वाढवत आहोत. मे महिन्यापासूनच याचा निर्णयही दिसू लागेल.

व्हायरस रूप बदलतोय
गृह मंत्री शाह यांनी यावेळी स्पष्ट केले, की या निर्णयांचा आणि कोरोना पसरण्याचा काहीही संबंध नाही. कारण व्हायरस आपले रूप बदलतो. एवढेच नाही, तर तो औषधांचा परिणामही कमी करतो, असेही शाह म्हणाले.

३ हजार कोटींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या