30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयअनेक देशांमधील लसी भारतात मिळणार

अनेक देशांमधील लसी भारतात मिळणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात लसीकरणाने वेग घेतला आहे. मात्र तुटवडाही मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत हा तुटवडा भरुन काढण्यासाठी तसेच वेगवान लसीकरणासाठी मोदी सरकारने जगातील जगातील अनेक देशांच्या कोरोनाप्रतिबंधक लसींच्या आपात्कालिक वापरास मंजूरी दिली आहे. मात्र वापराआधी त्या लसींचा चाचणी देशातील १०० रुग्णांवर करुन ७ दिवस त्यांच्या प्रकृतीचे निरीक्षण केले जाणार आहे.

मोदी सरकारने आपल्या आदेशात ज्या संस्थांचा उल्लेख केला आहे, त्या संस्था अमेरिका, युरोप, ब्रिटन, जपान आणि जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित आहेत. यू.एस. फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, यूरोपियन मेडिसिन एजन्सी, यू.के.एम.एच.आर.ए.,पी.एम.डी.ए.जपान आणि जागतिक आरोग्य संघटनांचा त्यात समावेश आहे. सरकारच्या या निर्णयामुळे रशियाच्या स्पुटनिक -व्ही लसीनंतर अनेक परदेशी लसी भारतात उपलब्ध होणार आहेत.

चाचणीनंतरच लसीकरणात सामील
सरकारने ज्या लसींना परवानगी दिली आहे, त्या लसींंची सर्वप्रथम पुढील ७ दिवसांपर्यंत १०० रुग्णांवर चाचणी केली जाईल. चाचणीत कोणतेही दुष्परिणाम दिसून येत नसल्यास लसीकरण कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्यात येईल. सरकारच्या निर्णयामुळे लसीकरण कार्यक्रमात गती येईल तसेच भारतीय औषध निर्माता कंपन्यांना परदेशी लस भारतात तयार करण्याची मंजुरी मिळविणेही सोपे होईल,असे सरकारने म्हटले आहे.

स्पुटनिक व्ही एप्रिल अखेरपर्यंत मिळणार
भारतीय औषध निर्माती कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने केलेल्या दाव्यानूसार स्फुटनिक व्ही ही लस ९१.६ टक्के प्रभावी आहे. ही लस भारतात चाचणीच्या तिस-या टप्प्यात असून डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने या लसीचे काही डोस एप्रिलअखेरपर्यंत भारतात उपलब्ध होतील, अशी माहिती दिली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने फेब्रुवारी महिन्यात ही लस आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी भारतीय औषध नियामकांकडे पाठवली होती.तसेच देशात ही कंपनी दरवर्षी ८५ कोटी डोसेसची निर्मिती करणार आहे.

रेमडेसिवीर परिणामकारक असल्याचा पुरावा नाही – डब्ल्यूएचओचे मत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या