24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयवजूखाना नऊ कुलपांनी सील, सीआरपीएफकडे सुरक्षा

वजूखाना नऊ कुलपांनी सील, सीआरपीएफकडे सुरक्षा

एकमत ऑनलाईन

वाराणसी : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीचा वजूखाना प्रशासनाने ९ कुलपे ठोकून सील केला आहे. तसेच याच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे सोपवण्यात आली आहे. सीआरपीएफचे दोन जवान २४ तास वजूखान्याचे रक्षण करणार आहेत. ही सुरक्षा दोन शिफ्टमध्ये केली जाणार असून, प्रत्येक शिफ्टमध्ये दोन जवान सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेक्षणादरम्यान, वजूखाना असलेल्या ठिकाणी एक सरोवर तसेच शिवलिंग आढळून आल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. मात्र, वजूखान्यात शिवलिंग नसून कारंजे सापडल्याचे मुस्लिम बाजूचे म्हणणे आहे.

वजूखान्याचा आणखी एक व्हिडिओ
दरम्यान, मशिदीच्या वजूखानाशी संबंधित आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. दुस-यांदा समोर आलेला व्हिडिओ देखील जुना असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत यासंबंधी दोन व्हिडिओ व्हायरल झाले असून, दोन्ही व्हिडिओ एक ते दोन महिने जुने असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असून, व्हिडिओमध्ये दिसत असलेली आकृती खरेच शिवलिंग आहे की कारंजे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हिंदू पक्ष याला शिवलिांग म्हणत आहे, तर मुस्लिम बाजू त्याला कारंजा म्हणत आहे.

न्यायालयात नवीन अर्ज
ज्ञानवापी मशिदीच्या पूर्वेला नंदीच्या समोर व्यास यांच्या तळघरात तात्पुरती भिंत आहे, ती काढून शिवलिंगापर्यंत जाण्यासाठी मार्ग तयार करावा, असे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या नव्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच शिवलिंगाच्या ठिकाणाभोवतीचा ढिगारा हटवण्याची आणि ज्या ठिकाणी शिवलिंग आढळून आले आहे तेथे पूजेसाठी परवानगी देण्याची मागणी याचिकाकर्त्या महिलेने केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या