22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयवंदे भारतने तोडला बुलेट ट्रेनचा विक्रम

वंदे भारतने तोडला बुलेट ट्रेनचा विक्रम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतातील नवी वंदे भारत ट्रेनने बुलेट ट्रेनचा रेकॉर्ड तोडला आहे. अवघ्या ५२ सेकंदात १०० किमीची स्पीड घेतल्याने वेगाच्या बाबतीत बुलेट ट्रेनला मागे टाकले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर हवेमधून पसरणा-या रोगापासून वाचण्यासाठी यामध्ये यंत्रणा बसवली गेली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. लवकरच ही ट्रेन मुंबई-अहमदाबाद रस्त्यावर धावेल अशी माहिती आहे.

नव्या वंदे भारत ट्रेनच्या चाचणीनंतर रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की वंदे भारतची तिसरी चाचणी गुरूवारी पुर्ण झाली. यावेळी १०० किमी पर्यंतचा वेग घेण्यासाठी फक्त ५२ सेकंदचा वेळ लागला. तर बुलेट ट्रेनला एवढा वेग घेण्यासाठी ५४.६ सेकंद लागतात. या नव्या वंदे भारतचा कमाल वेग हा १८० किमी प्रतितास एवढा आहे तर जुन्या वंदे भारतचा वेग हा १६० किमी प्रतितास एवढा आहे अशी माहिती वैष्णव यांनी दिली.

त्यांनी पुढे सांगितले की आरामदायक प्रवासासाठी या ट्रेनमध्ये अनेक सुविधा आहेत. यामधील गुणवत्तामध्ये सुधारणा करण्यात आल्या असून या सर्व वैशिष्ठ्यांसह ट्रेनचा स्कोर हा ३.२ आहे तर जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट स्कोर हा २.९ इतका आहे असे ते म्हणाले आहेत. लवकरच ही ट्रेन धावणार असल्याची माहिती आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या