24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयवाहने १०० टक्के इथेनॉलवर चालविणार

वाहने १०० टक्के इथेनॉलवर चालविणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सरकारने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर एक नवा पर्याय काढला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सरकाचा प्लॅन सांगितला आहे. त्यांनी म्हटले की, २०२३-२४ पर्यंत इथेनॉल ब्लेंडिंगचे लक्ष २० टक्के ठेवण्यात आले आहे. सरकारचे लक्ष १०० टक्के वाहने इथेनॉलवर चालवण्याचे आहे. गोयल यांनी म्हटले आहे की, येत्या काही दिवसात बॅटरी टेक्नॉलॉजीची मागणी वाढणार आहे. अपारंपारीक क्षेत्रात जास्त विकासामुळे बॅटरी इंडस्ट्रीचा विकास होणार आहे.

पियुष गोयल यांनी म्हटले की, आमचे ध्येय अपारंपारीक ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याचे आहे. आम्ही अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप करू की ज्याच्या मदतीने पेट्रोलच्या ऐवजी १०० टक्के वाहने इथेनॉलवर चालतील. ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक कार आहे, त्यांना आवाहन करतो की, आपली कार सौरऊर्जा किंवा अपारंपारीक ऊर्जेच्या माध्यमातून रिचार्ज करा. त्यासाठी भविष्यात मोठ्या स्तरावर चार्जिंग स्टेशनचे इफ्रास्ट्रक्चर तयार करण्यात येणार आहे.

सध्या इथेनॉलची ब्लेडिंग किती ?
आधी इथेनॉलचे ब्लेडिंग टार्गेट २०२२ पर्यंत १० टक्के आणि २०३० पर्यंत २० टक्के ठेवण्यात आले होते. परंतु हे लक्ष आता वाढवण्यात आले आहे. आता देशातील पेट्रोलमध्ये साधारण ८.५ टक्के इथेनॉल मिळवले जाते. २०१४ मध्ये हेच प्रमाण १ ते १.५ टक्के इतके होते.

सर्वपक्षीय ओबीसींचा २४ जुलैला लातूरात जागर मेळावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या