22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeराष्ट्रीयभाजपचे दिग्गज नेते गुजरातेत वानप्रस्थाश्रमात

भाजपचे दिग्गज नेते गुजरातेत वानप्रस्थाश्रमात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने गुजरातमध्ये तिकीटवाटप करताना यंदा सर्वार्थाने भाकरी फिरविण्याचा प्रयोग केला आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपानी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह अनेक माजी मंत्र्यांची आणि तीन डझनहून अधिक आमदारांची तिकिटे भाजपने यंदा कापली आहेत. गेली २७ वर्षे भाजपने एकहाती राखलेला गुजरातचा गड यंदा आणखी भक्कम करणे, जातीपातीची समीकरणे सांभाळणे, युवा चेहऱयांना संधी देऊन मेक देम यंग’ चा प्रयोग राबविणे, सातत्याने सत्तेत राहिल्याने राज्य पक्षसंघटनेत आलेले चाल सेचे वातावरण बदलून कार्यकर्त्यांत चैतन्य आणणे हे ठळक उद्देश यामागे दिसत आहेत.

भाजपची देशातील राजकीय प्रयोगशाळा असलेल्या गुजरातसारख्या राज्यात असा प्रयोग करण्याची रिस्क पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली. राजकीय जाणकारंच्या मते यामागचे एकमेव कारण म्हणजे मोदींनी दिल्लीत येताना गुजरातची राजकीय घडीच अशी बसविली आहे की तेथे भाजपचे राज्य नेते नव्हेत तर कमळ हे भाजपचे चिन्ह आणि फक्त आणि फक्त मोदींचा चेहरा यावरच प्रत्येक निवडणूक लढविली जाते. सूरतच्या महापालिका निवडणुकीत असे करणे यापूर्वी पक्षाला महागात गेले होते. पण आता विधानसभेचे रणांगण असल्याने भाजप नेतृत्वाने ही केमोथेरपी करूनच टाकली असे जाणकार मानतात.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या