22.5 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home राष्ट्रीय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू कोरोना पॉझिटिव्ह

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू कोरोना पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

पत्नी उषा यांचा कोरोना अहवाल मात्र निगेटिव्ह आला

नवी दिल्ली – देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच आज देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना देखील कोरोना बाधा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबतची माहिती नायडू यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार आज सकाळी व्यंकय्या नायडू यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असं असलं तरी त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे.नायडू यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी त्यांच्या पत्नी उषा यांचा कोरोना अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. असं असलं तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्या स्वतःला अलगीकृत करून घेतलं आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या