28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयमोहालीमध्ये ६० विद्यार्थीनींचा आंघोळ करतानाचा व्हीडीओ व्हायरल

मोहालीमध्ये ६० विद्यार्थीनींचा आंघोळ करतानाचा व्हीडीओ व्हायरल

एकमत ऑनलाईन

मोहाली : पंजाबच्या मोहालीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंदीगड युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हीडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. धक्कादायक बाब म्हणजे त्याच विद्यापिठातील एका विद्यार्थिनीने इतर विद्यार्थिनींचा आंघोळ करताना व्हीडीओ काढून व्हायरल केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणात आंघोळीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर काही तरुणींनी आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण देत कोणत्याही तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मोहालीत चंदीगड युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हीडीओ व्हायरल झाले. धक्कादायक म्हणजे याच विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने ६० विद्यार्थिंनींचा आंघोळ करतानाचा व्हीडीओ शिमल्यात राहणा-या एका मित्राला पाठवले होते. हे व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात मोठा गोंधळ घातला. त्यानंतर व्हीडीओ बनवणा-या विद्यार्थिनीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपी तरुणी पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणावरून विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात एकच गोंधळ घातला. यानंतर एमएमएस बनवणा-या तरुणीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी या तरुणीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आरोपी तरुणी अनेक दिवसांपासून विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचा व्हीडीओ बनवत होती आणि तिच्या ओळखीच्या तरुणाला पाठवत होती. या तरुणाने हे व्हीडीओ इंटरनेटवर टाकले होते. त्यानंतर हे व्हीडीओ व्हायरल झाले. जेव्हा तरुणींनी त्यांचे व्हीडीओ इंटरनेटवर पाहिले तेव्हा त्यांना धक्का बसला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या