23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeराष्ट्रीयविजय माल्ल्या दिवाळखोर

विजय माल्ल्या दिवाळखोर

एकमत ऑनलाईन

लंडन : भारतातील विविध १७ बँकांचे ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकविणा-या विजय माल्ल्याला लंडन हायकोर्टाने दिवाळखोर ठरवले आहे. अनेक बँकांची फसवणूक करून विजय माल्ल्या भारतातून फरार आहे. विजय माल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणासाठीही भारताकडून प्रयत्न सुरु आहेत.

लंडन हायकोर्टाने आज (सोमवार) विजय माल्ल्याला दिवाळखोर म्हणून घोषित करून जबरदस्त झटका दिला आहे. याचबरोबर भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात भारतीय बँकांच्या कंसोर्टियमने माल्ल्याची कंपनी किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाच्या वसुलीशी संबंधित खटलादेखील जिंकला आहे. लंडन हायकोर्टाच्या या निर्णयामुळे आथा विजय माल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. तसेच विजय माल्ल्याकडून हायकोर्टाच्या आदेशाविरोधात अपील करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचेही समोर आले आहे.

बँकांच्या कंसोर्टियमने लंडन हायकोर्टाकडे मागणी केली होती की, माल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला देण्यात आलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्याला दिवाळखोर घोषित करावे. भारतीय बँकांच्या या याचिकेवर झालेल्या व्हर्चुअल सुनावणीत लंडन हायकोर्टाने बँकांच्या बाजूने निकाल देत हायकोर्टाचे न्यायाधीश माइकल ब्रिग्स यांनी विजय माल्याला दिवाळखोर घोषित केले जात असल्याचा निर्णय दिला.

एसबीआयच्या नेतृत्वातील कंसोर्टियममध्ये बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, फेडरल बँक लिमिटेड, आयडीबीआय बँक, इंडियन ओवरसीज बँक, जम्मू अ‍ॅण्ड़ काश्मीर बँक, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ मैसूर, यूको बँक, यूनाइटेड बँक ऑफ इंडिया आणि जेएम फायनानशीयल अ‍ॅसेट रिकंस्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. आदींचा समावेश आहे.

पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा सुरळीत करा, रस्ते दुरूस्तीची कामे तातडीने सुरू करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या