36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeराष्ट्रीयविजय मल्ल्याला ब्रिटिश न्यायालयाचा दणका

विजय मल्ल्याला ब्रिटिश न्यायालयाचा दणका

एकमत ऑनलाईन

लंडन : भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्यामुळे आता लंडनमधील आलिशान घरही त्याच्या हातातून गेले आहे. स्विस बँक यूबीएससोबत दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर वादात ब्रिटीश न्यायालयाने मल्ल्याचा अर्ज फेटाळला आहे. हे घर खाली करण्याचा आदेश काढला होता. या आदेशावर स्थगिती आणण्याची मागणी मल्ल्याने केली होती. परंदू ब्रिटिश न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे.

विजय मल्ल्याच्या याचिकेवर, लंडन उच्च न्यायालयाच्या चॅन्सरी विभागाचे न्यायाधीश मॅथ्यू मार्श यांनी निर्णय दिला. कर्जाची रक्कम परत करण्यासाठी मल्ल्या कुटुंबाला आणखी वेळ देण्यासाठी कोणतेही कारण नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा आलिशान बंगला मल्ल्याच्या हातातून गेला आहे. विजय मल्ल्यावर स्विस बँकेचे सुमारे २०४ दशलक्ष पौंडांचे कर्ज आहे.

या कर्जाची परतफेड त्याला करावी लागणार आहे. हे प्रकरण मल्ल्याची कंYपनी असलेल्या रोझ कॅपिटल व्हेंचर्सने घेतलेल्या कर्जाशी संबंधित आहे. ज्यामध्ये किंगफिशर एअरलाइन्सचे माजी मालक विजय मल्ल्या, त्याची आई ललिता आणि मुलगा सिद्धार्थ यांना मालमत्ता ताब्यात घेण्याच्या अधिकारासह सह-प्रतिवादी म्हणून सूचीबद्ध केले होते.

मार्च २०१६ मध्ये विजय मल्ल्या भारतातून ब्रिटनमध्ये पळून गेला. भारतात, त्याच्यावर ९ हजार कोटी रुपयांची बँकेची फसवणूक केल्याचा आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. अनेक बँकांनी किंYगफिशर एअरलाइन्सला कर्जे दिली होती. या प्रकरणांमध्ये मल्ल्या वॉण्टेड आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या