25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeराष्ट्रीयभारतीय लष्कराला गावक-यांची साथ

भारतीय लष्कराला गावक-यांची साथ

लडाखमधील ग्रामस्थांचे देशप्रेम ; रेडी टू इट सारखे पदार्थ

एकमत ऑनलाईन

लडाख : पूर्व लडाखमधील सीमेवर संघर्ष अजून मिटलेला नाही. भारतीय जवानांना अतिथंड अशा प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे भारत सरकार जवानांसाठी सोयी पुरवित असताना सीमा भागांमधील गावकरीही लष्करासाठी खाण्यापिण्याच्या गोष्टी पाठवत आहेत.

हे अन्न पदार्थ प्रामुख्याने उंच ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या सैनिकांना पाठवण्यात येत आहेत. थंडीच्या कालावधीमध्ये हे पदार्थ सैनिकांना रेडी टू इट प्रमाणे केवळ गरम पाण्यात उकळून खाता येतील असा या मागील उद्देश आहे.

दीर्घकाळ प्रथिने व उष्णतेचा पुरवठा
गावकरी वाळवलेले कोरडे पनीर मोठ मोठ्या पिशव्यांमध्ये भरुन सैनिकांसाठी पाठवत आहेत. या पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात जे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. तसेच हे पनीर अनेक महिने टीकून राहू शकते. त्यामुळे येणा-या थंडीच्या कालावधीमध्येही या पनीरचा वापर करता येणार आहे.

तसेच गावकरी जवानांना साग सारख्या पालेभाज्याही पाठवत आहेत. या भाज्या पाण्यामध्ये उकळून खाता येतात. तसेच सत्तूची पावडरही सैनिकांना पाठवली जात असून ही पावडर पाण्यात उकळून त्याचा सूपसारखा वापर करता येतो. यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णता मिळते.

देशाला विभागण्यासाठी भाजपकडून लव्ह जिहाद शब्दाची निर्मिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या