25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयनिवडणुक निकालानंतर बंगालमध्ये हिंसाचाराचे थैमान

निवडणुक निकालानंतर बंगालमध्ये हिंसाचाराचे थैमान

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र भाजपचा मोठा पराभव करत तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सलग तिस-यांदा सत्ता मिळवण्यात यश मिळवले आहे. मात्र निकालानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला असून ठिकठिकाणी झालेल्या घटनांत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी राज्यपाल जगदीश धनखड यांची भेट घेत निवेदन दिले आहे. राज्यात निवडणुक निकालानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेल्या हिंसाचारात २४ तासांत ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात भीतीचे वातावरण आहे. पोलिस निष्क्रिय आहेत, स्आा आरोप दिलीप घोष यांनी केला आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षही हातावर हात ठेवून गप्प बसला आहे. त्यामुळे आम्ही राज्यपालांकडे निवेदन घेऊन आलो होतो, त्यांनी निवेदनाचा स्वीकार केला आणि कारवाईचे आश्वासन दिल्याचेही घोष यांनी सांगितले आहे.

भटपारात भाजप कार्यालयावर हल्ला
भटपारा येथील घोषपारा रोडवरील भाजप कार्यालय आणि काही दुकानांमध्ये अज्ञात सोमवारी लोकांनी तोडफोड केली. परिसरात बॉम्बही फेकण्यात आले. टीएमसीच्या उपवद्रवींनी माझे दुकान लुटले. येथे कमीतकमी १० बॉम्ब फेकले गेले, असे एका स्थानिक दुकानदाराने म्हटले आहे. रविवारी निवडणुकीचे निकाल लागताच नंदीग्राममध्ये हिंसक घटना घडली होती. नंदीग्रामच्या भाजप कार्यालयावरही हल्ला करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

रेमडेसिवीर देता का कुणी… रेमडेसिवीर; रूग्णांचे नातेवाईक नटसम्राटच्या भुमिकेत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या