नूह : हरियाणातील नूह (मेवात) येथे सोमवारी किरकोळ कारणावरून दोन समुदायांच्या लोकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. खेडा खलीलपूर गावात झालेल्या या हाणामारीत दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली. लोकांनी एकमेकांवर लाठ्यांचा वर्षाव केला आणि गोळ््याही झाडल्या.
या भांडणात सुमारे डझनभर लोक जखमीही झाले. काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावात तणावाचे वातावरण असून दोन्ही बाजूचे लोक तिथे जमले आहेत. त्यामुळे तणाव वाढला आहे.