22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयकार दुचाकीची जोरदार धडक, भीषण अपघाताचा थरारक व्हिडिओ

कार दुचाकीची जोरदार धडक, भीषण अपघाताचा थरारक व्हिडिओ

एकमत ऑनलाईन

गुजरात :  वाहन चालवताना काळजीपुर्वक चालवले पाहिजे असे वारंवार सांगितले जाते. सध्या मुख्य रस्ते आता मोठ्या प्रमाणात चांगले सुसज्ज आणि मोठे झाले असले तरी वाहनधारकाची जबाबदारी आणखी वाढली असल्याचे लक्षात येते. गुजरातच्या गोंडल महामार्गावरील हा भीषण अपघाताचा एक व्हिडिओ समोर येत आहे. अपघात एवढा भीषण होता की वाहनांचा चक्काचूर झाला असून त्यातील कोणीच वाचले नसेल असे प्रथमदर्शनी वाटते. भारधाव जाणाºया कार आणि दुचाकीमधील हा थरार आहे.

दुचाकीवर असलेले दोन्ही तरुण गंभीर
हा भीषण अपघात गुजरात महामार्गावरील गोंडल इथे घडला आहे. यामध्ये दुचाकीवर असलेले दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दुसºया लेनमध्ये आल्यानं झाला हा भीषण अपघात
वेगात असलेला कार चालकाची या दुचाकीला जोरदार धडक बसली आणि त्यामुळे दुर्घटना घडली. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता दुचाकी चालक लेन सोडून दुस-या लेनमध्ये आल्यानं हा भीषण अपघात झाला आहे. हा संपूर्ण प्रकार कारमध्ये असलेल्या मोबाईलफोनमध्ये कैद झाला आहे. अंगावर शहारे आपणारा अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये कार आणि दुचाकीचं मोठं नुकसान झालं आहे.

Read More  तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत आहे -पंकजा मुंडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या