नवी दिल्ली : पेरू या देशातील भारताचे राजदूत म्हणून विश्वास विदू सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे. ते सध्या परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव आहेत. त्यांची ही नियुक्ती परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. विश्वास विदू सपकाळ हे १९९८ च्या बॅचचे आएफएस अधिकारी आहेत. त्यांच्या नियुक्तीची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.