नवी दिल्ली : भारतातील चिनी मोबाईल कंपनी विवोवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास तीव्र केल्यानंतर कंपनीचे दोन संचालक पळून गेल्याची माहिती आहे.
विवोचे संचालक झेंगशेन ओऊ आणि झांग जी भारतातून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने मंगळवारी विवो आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या ४४ ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर दोन संचालक फरार झाले आहेत.