24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयदेशात व्हीएलसी मीडिया प्लेअरवर बंदी

देशात व्हीएलसी मीडिया प्लेअरवर बंदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात व्हीएलसी मीडिया प्लेअर अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारकडून व्हीएलसीअ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. हे अ‍ॅप युजर्सचा डेटा चोरी करत असल्याचा आरोप होत होता असे काही मीडिया रिपोर्टमध्ये बोलले जात आहे. या संदर्भात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सरकारने या अ‍ॅपवर बंदी आणली आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल प्ले स्टोअर सारख्या साईटवरून हटवण्यात आले आहे.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, केंद्र सरकारने आयटी कायदा २००० अंतर्गत व्हीएलसी मीडिया प्लेयर आणि व्हीएलसी प्रोजेक्टच्या वेबसाइटवर बंदी घातली आहे. व्हीएलसी मीडिया प्लेयर आणि त्याची वेबसाईट दोन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. मात्र, कंपनीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण व्हीएलसी प्लेअरची वेबसाइट डाउन आहे आणि डाउनलोड लिंकदेखील ब्लॉक करण्यात आल्या आहेत. व्हीएलसी मीडिया प्लेअरची वेबसाईट ओपन केल्यावर आय अ‍ॅक्ट अंतर्गत बॅन केल्याचा मेसेज दिसतो.

काय आहे कारण?
व्हीएलसी मीडिया प्लेअर प्रोजेक्ट अंतर्गत फ्रान्समध्ये तयार करण्यात आलेले अ‍ॅप आहे. भारत सरकारने या अ‍ॅपवर बंदी घातली आहे. त्यामुळे हे अ‍ॅप आता भारतात वापरता येणार नाही. एसीटी फायबरनेट, व्हीआय यासारख्या इंटरनेट सेवा देणा-या कंपन्यांवरूनही हटविण्यात आले आहे. याआधी भारत सरकारने चीनी अ‍ॅपवर बंदी घातली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या