30.8 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home राष्ट्रीय लोजप नाही तिथे भाजपला मत द्या : चिराग पासवान

लोजप नाही तिथे भाजपला मत द्या : चिराग पासवान

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहार विधानसभा निवडणूकीसाठी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी सोशल मिडीयावर ‘#असंभव नितीश’ मोहीम सुरू केली आहे. त्यानूसार ‘जिथे लोजप उमेदवार नाही तिथे भाजप उमेदवाराला मत द्या’ असे आवाहन मतदारांना केले आहे. चिराग पासवान हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष आहेत. नूकताच त्यांनी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जागावाटपाच्या कारणावरुन बिहारमध्ये स्वत्रंत्रनिवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र सातत्याने भाजपाला मित्र असेच संबोधत संजदचे नेते मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरुद्ध जोरदार हल्लाबोल सुरु केला आहे.

राजकीय वर्तूळात याबाबत प्रतिक्रिया देताना तज्ज्ञांकडून ही भाजपाची नितिशकुमार यांना संपविण्याची चाल असल्याचे बोलले जात होते. भाजपाच्या मोठ्या नेत्यांनी अखेर नितिशकुमार हेच मुख्यमंत्री असतील अशी भुमिका जाहीर पणे सांगितली. दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर न पडलेल्या चिराग पासवान यांनी अद्यापही नितिशकुमार यांना लक्ष्य करणे सोडले नसून भाजपाबाबत मवाळ भुमिका घेत सातत्याने संजदवर टीकास्त्र सोडले आहे. त्यातच आता सोशल मिडियावर लोजपाने नव्याने सुरु केलेल्या ‘#असंभव नितीश’ आणि ‘नितीशमुक्त सरकार’ मोहीमेत जिथे लोजपाचा उमेदवार नसेल तिथे भाजपाच्या उमेदवारांना मतदान करा ,असे आवाहन केले आहे. ज्या मतदारसंघांत लोक जनशक्ती पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहे त्या सर्व ठिकाणी ‘बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट’ लागू करण्यासाठी लोजपाच्याच उमेदवारांना मते द्या. तर इतर ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सहकाºयांना मते द्या. येणारे सरकार हे नितीशमुक्त सरकार बनणार’असे ही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

..तर नितिशकुमार जेलमध्ये
चिराग पासवान एकप्रकारे आपल्या सर्वच सभांमध्ये नितीश सरकारला पाडण्याची आणि भाजप – लोजपाचे एनडीए सरकार बनवण्याचेच चित्र लोकांसमोर मांडत आहेत. नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी जर लोजपाचे सरकार आले तर नितीशकुमार यांना जेलमध्ये टाकू असे वक्तव्य केले आहे. लोजपाने जेडीयूविरुद्ध सर्वच जागांवर उमेदवार उभे केले आहेत. अनेक जागांवर भाजपच्याच बंडखोरांना लोजपाचे तिकीट देऊन जेडीयूविरुद्ध मैदानात उतरवले आहे.

तीन दिवसात गळफास घेऊन दोघांची आत्महत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या