25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयराष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला मतदान

राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला मतदान

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची आज घोषणा केली. त्यानुसार उमेदवारांना २९ जूनपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर १८ जुलै रोजी निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर २१ जुलै रोजी निकाल जाहीर होणार असल्याने देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. या निवडणुकीतील सर्वच प्रक्रियेची व्हीडिओग्राफी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकीत मतदानासाठी विशेष शाई असलेले पेन देण्यात येईल. मतदान करताना लोकप्रतिनिधींना १,२,३ असा पसंतीक्रम ठरवता येईल. पहिली पसंती न सांगितल्यास मत रद्द ठरवले जाईल, असेही सांगण्यात आले.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. ते २०१७ मध्ये या पदावर विराजमान झाले होते. कोविंद देशाचे १५ वे राष्ट्रपती आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएची स्थिती गतवेळसारखीच मजबूत आहे. पण यावेळी त्यांनी आंध्र प्रदेश व ओडिशाकडून समर्थन मागितले आहे. त्यामुळे एनडीएला बहुमताचा जादुई आकडा गाठणे फार अवघड नाही.

राष्ट्रपतीपदाच्या मागील निवडणुकीत एनडीची कामगिरी खूप चांगली झाली. रामनाथ कोविंद यांना ६५.३५ टक्के मतदान मिळाले होते. यावेळीही त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न राहणार आहे.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत राज्यसभेचे सदस्य सहभागी होतात. त्यामुळे १० जून रोजी राज्यसभेच्या ५७ जागांपैकी १६ जागांवर होणा-या निवडणुकीवर सर्वांची नजर आहे. ५७ पैकी ४१ जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

अशी होते राष्ट्रपती निवडणूक
राष्ट्रपतीपदाची निवडणूक सर्वसाधारण निवडणुकीसारखी नसते. यात जनतेने निवडून दिलेले आमदार व खासदार मतदान करतात. त्यांच्या मतदानाचे मूल्य वेगवेगळे असते. संविधानातील कलम-५४ नुसार, राष्ट्रपतीची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते. या सदस्यांचे प्रतिनिधित्व प्रमाणपद्ध असते. म्हणजे त्यांचे सिंगल मत ट्रान्सफर होते. पण त्यांच्या दुस-या पसंतीच्या मताची मोजणी केली जाते.

असे बनते इलेक्टोरल कॉलेज
लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य मिळून राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेज तयार करतात. यात ७७६ खासदार (नामांकित वगळून) व विधानसभेचे ४१२० आमदारांचा समावेश असतो. इलेक्टोरल कॉलेजचे एकूण मूल्य १०,९८,८०३ आहे.

असे होते मतदान
मतदानात सहभागी होणारे सदस्य प्रथम आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करतात. ते मतपत्रिकेवर राष्ट्रपतीपदासाठी आपली पहिली, दुसरी व तिसरी पसंती नमूद करतात. पहिल्या पसंतीच्या मतांतून विजयी उमेदवार घोषित झाला नाही, तर त्याच्या खात्यात दुस-या पसंतीची मते ट्रान्सफर केली जातात. त्यामुळे त्याला सिंगल ट्रान्सफरेबल मतदान म्हटले जाते.

असे ठरते आमदारांच्या मताचे मूल्य
आमदारांच्या मतांचे मूल्य राज्य व विधानसभा क्षेत्रातील लोकसंख्येवर अवलंबून असते. मताचे मूल्य ठरवण्यासाठी राज्याच्या लोकसंख्येला निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येशी भागले जाते. त्यानंतर येणा-या उत्तराला म्हणजे आकड्याला १००० ने भागले जाते. या प्रकारे त्या राज्याच्या आमदाराच्या एका मताचे मूल्य ठरवले जाते. यात आलेले उत्तर ५०० हून अधिक असेल, तर त्यात १ जोडला जातो.

असा होतो जय-परायचा फैसला
राष्ट्रपती निवडणुकीत केवळ सर्वाधिक मते मिळाल्याने विजेता ठरत नाही. खासदार व आमदारांच्या मतांच्या एकूण मूल्याच्या अर्ध्याहून अधिक हिस्सा मिळवणारा उमेदवारच राष्ट्रपती होतो.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या