22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीययुद्ध हे केवळ सैन्यातच नसते

युद्ध हे केवळ सैन्यातच नसते

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय लष्कराकडून आर्मी लॉजिस्टिक कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले होते. यावेळी लष्कराच्या आधुनिकीकरणा पासून युद्धाच्या परिणामांवर चर्चा करण्यात आली. यावेळी लष्कर प्रमुखांनी भाषणही केले.

युद्धावर चर्चा करताना ते म्हणाले की युद्धे केवळ सैन्यातच होत नाहीत तर त्यात संपूर्ण देशाचा प्रयत्न असतात. युद्धे राष्ट्रीय लवचिकतेची चाचणी घेतात आणि देशाची साधने आणि क्षमता वाढवतात. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला संघर्ष हे त्याचे ताजे उदाहरण आहे. पांडे यांनी सांगितले की जर एखादा देश हारत असेल तर त्याच्या मागचे कारण हे रसद असते. लष्करी कारवाईचा वेग, तीव्रता आणि पोहोच यासाठी पुरेसा रसद पुरवणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी रसदेवर विषेश लक्ष दिले पाहिजे. मनोज पांडे म्हणाले की, कार्यक्षम संयुक्त लष्करी-नागरिक रचना लागू करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि चीनने उचललेली पावले या विषयाशी निगडीत अधोरेखित करतात.

भारताची मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल
त्यानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत, सरकारने देशातील लॉजिस्टिकला एकत्रित करण्यासाठी आणि स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण धोरणे तयार केली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या