21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीय१९७५ मधील आणीबाणी घटनाविरोधी होती?

१९७५ मधील आणीबाणी घटनाविरोधी होती?

याचिकेवर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा होणार; केंद्र सरकारला पाठविण्यात आली नोटीस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये १९७५ ते १९७७ या कालावधी १९ महिन्यांसाठी लागू करण्यात आलेली राष्ट्रीय आणीबाणी ही घटनाविरोधी होती, असे जाहीर करण्याची मागणी करणा-या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला. १९७५ साली लागू करण्यात आलेली आणीबाणी ही घटनाविरोधी होती की नाही यासंदर्भातील सुनावणी करण्यास न्यायालयाने होकार दिला आहे. न्यायमुर्ती संजय कृष्णा कौल, दिनेश महेश्वरी आणि ऋषिकेश रॉय यांच्या खंडपिठासमोर झालेल्या सुनावणीनंतर केंद्र सरकारला यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे.

९४ वर्षीय विरा सारिन यांनी ही याचिका दाखल केली असून यासंदर्भात आज सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी सारिन यांची बाजू मांडली. आणीबाणीमुळे झालेले नुकसान म्हणून आपल्याला २५ कोटींची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही याचिकार्त्यांनी केली होती. मात्र याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर ४५ वर्षानंतर अशा विषयांसंदर्भात निकाल देणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. तसेच याचिकाकर्त्यांना त्यांच्या याचिकेमधून सुधारणा करायची असल्यास आम्ही त्यांना १८ डिसेंबरपर्यंतचा वेळ देत आहोत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळेच आता यासंदर्भात केंद्राला नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच १८ तारखेपर्यंत सुधारणा करुन पुन्हा याचिका दाखल करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

व्यक्ती जिवंत असताना मृत्यू प्रमाणपत्र मिळवले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या