22.9 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeराष्ट्रीयराजदची हालचालींवर नजर

राजदची हालचालींवर नजर

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून, सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. नितीशकुमारच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असे भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, नितीशकुमार यांच्या पक्षाला यावेळी कमी जागा मिळाल्याने त्यांना भाजपच्या प्रभावाखाली राहण्याचा धोका त्यांना सतावत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजप नेते त्यांची समजूत काढत आहेत.

एनडीएमधील ही स्थिती लक्षात घेऊन राजद नेते तेजस्वी यादव यांनीही राज्यात महागठबंधनसाठीही चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी एनडीएमधील घटकपक्षांना चुचकारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एनडीएमधील हम आणि व्हीआयपी या दोन पक्षांना ४-४ जागा आहेत. ते राजदसोबत आल्यास राज्यात उलथापालथ होऊ शकते, असा राजकीय तज्ज्ञांचा कयास आहे.

राजद नेते तेजस्वी यादव यांनी आज पक्षाच्या नूतन आमदारांची माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उपस्थित आमदारांना महागठबंधन सरकार स्थापन होईल, असे सांगत आमदारांना तयार राहण्याचा आदेश दिला. यामुळे बिहारमध्ये पुढील काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. निकालानंतर पहिल्यांदाच तेजस्वी यादव यांनी नवनियुक्त आमदारांसोबत बैठक घेत सर्वांचे अभिनंदन केले. तसेच पत्रकार परिषदही घेतली.

तेजस्वी यादव यांनी यावेळी नितीशकुमार यांच्यावर टीका करत तुमच्याकडे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर कट रचणे सोडून द्या, असा टोला लगावला. त्यांनी लोकांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे आणि आपल्या पदावरून मागे हटले पाहिजे, असे ते म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीलाच लोकांनी कौल दिला होता. मात्र, निवडणूक एनडीएच्या बाजूने होती. त्यामुळे ते निवडणूक जिंकले, असा आरोप राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला.

महागठबंधनच्या बाजूने होता जनमताचा कौल
जनतेचा निर्णय महागठबंधनच्या बाजूने होता, पण निवडणूक आयोगाचा निर्णय एनडीएच्या बाजूने होता. पण हे पहिल्यांदा झालेले नाही. २०१५ मध्येही जेव्हा महागठबंधन झाले होते. तेव्हाही निकाल आमच्या बाजूने होता, पण भाजपने मागच्या दरवाजाने प्रवेश केला, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली. यावेळी त्यांनी जनतेचेही आभार मानले.

राजद आमदारांना पाटण्यात थांबण्याचा यादव यांचा आदेश
पक्ष बैठकीत तेजस्वी यादव यांनी राजदच्या सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघात न परतता पुढील एक महिना पाटण्यातच थांबण्याचा आदेश दिला आहे. विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) आणि हिंदुस्थान आवाम मोर्चाचा (हम) एनडीएमध्ये कशा पद्धतीने समावेश होतो, हे पाहून पुढील रणनीती ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले.

सरकार एनडीएचेच पण मुख्यमंत्रिपदावर दावा नाही
नितीशकुमार यांनी जेडीयूच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक घेतली. त्यानंतर प्रथमच बोलताना जनतेने एनडीएला बहुमत दिले असून सरकार स्थापन केले जाईल, अशी माहिती दिली. नितीशकुमार यांनी यावेळी आपण मुख्यमंत्रिपदावर दावा केलेला नसून याबाबत एनडीए निर्णय घेईल, असे म्हटले आहे. तसेच शपथग्रहणाची तारीखही अद्याप ठरलेली नसल्याचे म्हटले.

मांझींचा नितीश यांना पाठिंबा
हमचे नेते जीतनराम मांझी यांनी आज जदयू नेते नितीशकुमार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मी मुख्यमंत्री राहिलो आहे. त्यामुळे कोणतेही मंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही. ब-याच माजी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपद स्वीकारले. पण ते मी करणार नाही. मी कुठलीही मागणी नाही, असे मांझी म्हणाले.

जिल्हा रोगमुक्त… हेच कंठेवाड बंधूंचे अंतिम ध्येय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या