34.4 C
Latur
Friday, March 5, 2021
Home राष्ट्रीय आम्ही भाजपाच्या विरोधात आहोत, देशाच्या नाही

आम्ही भाजपाच्या विरोधात आहोत, देशाच्या नाही

फारुख अब्दुल्ला ; धर्माच्या नावावर फुट टिकणार नाही

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांच्या निवासस्थानी शनिवारी( दि.२४) पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन च्या सदस्यांची बैठक पार पडली. बैठकीत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे सहभागी होते. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना फारुख अब्दुल्ला यांनी आम्ही केवळ भाजपाच्या विरोधात आहोत, देशाच्या नाही,असा दावा केला.

अब्दुल्ला म्हणाले की, ही काही देशविरोधी जमात नाही. जम्मू-काश्मीर व लडाखच्या नागरिकांना त्यांचे अधिकार पुन्हा मिळावेत,एवढाच आमचा उद्देश आहे. धर्माच्या नावावर आमच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरतील. ही कोणतीही धार्मिक लढाई नाही.

सज्जाद लोन यांनीही माध्यमांशी संवाद साधला. फारुख अब्दुल्ला या समितीचे अध्यक्ष तर मेहबूबा मुफ्ती उपाध्यक्ष असणार आहेत. या संबंधी पुढील महिनाभरात कागदपत्रांची पुर्तता देखील केली जाणार आहे.ग्रुपच्या माध्यमातून आम्ही ज्या गोष्टींबाबत खोटा प्रचार सुरु आहे, त्या बाहेर आणू असे सांगितले.

बैठकीसाठी पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन, पीपल्स मूव्हमेंटचे नेते जावेद मीर आणि माकपचे नेते मोहम्मद युसूफ तारिगामी उपस्थित होते. या अगोदर १५ ऑक्टोबर रोजी देखील फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी राज्यातील अनेक पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली होती.

नांदेड जिल्ह्यात ७६ बाधित तर एक जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या