21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयदिशाभूल करायला आम्ही लहान मुलं नाही - ओवेसी

दिशाभूल करायला आम्ही लहान मुलं नाही – ओवेसी

एकमत ऑनलाईन

हैद्राबाद : ‘सुधारित नागरिकत्व कायद्यावरून काही लोक मुस्लिम बांधवांची दिशाभूल करत आहेत,’ असे विधान मोहन भागवत यांनी रा.स्व.संघाच्या दसरा मेळाव्याम केले होते. त्यावरुन एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भागवत यांच्यावर टीका केली आहे.‘दिशाभूल करायला आम्ही लहान मुले नाही आहोत,’ असे ओवेसी यांनी म्हटले आहे. विजयादशमीनिमित्त रेशीम बागेत झालेल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल भाष्य केले होते. त्यावरून ओवेसी यांनी भागवत यांना काही सवाल विचारले आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करुन भागवत यांच्यावर टीका केली आहे. ओवेसी म्हणाले,‘दिशाभूल करायला आम्ही लहान मुले नाही. सीएए व एनआरसी म्हणजे काय याबद्दल भाजपाने कोणतेही भाष्य केले नाही. जर ते मुस्लिमांबद्दल नसेल, तर कायद्यातून सर्व धर्माचे संदर्भ काढून टाकणार का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. आम्हाला भारतीयत्व सिद्ध करायला लावणा-या कायद्यांविरोधात पुन्हा पुन्हा आंदोलन करू,’ असा इशारा ओवेसी यांनी दिला आहे.
‘‘धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणाºया कायद्याविरोधात आंदोलन करताना आम्हाला राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आदींनी मदत केली नाही,असा आरोपही त्यांनी केला. ‘आंदोलनावेळी तुम्ही बाळगलेले मौन विसरलेलो नाही. भाजपाचे नेते सीमांचलच्या लोकांना घुसखोर म्हणत असताना राजद व काँग्रेसने एकदाही तोंड उघडले नाही,’असे ओवेसी म्हणाले.

सीएए बाबत दिशाभुल : भागवत
‘सुधारित नागरिकत्व कायदा कोणत्याही विशिष्ट धर्माला विरोध करत नाही. तरीही काही लोक या कायद्याविरोधात निषेध करत आहेत. मुस्लीम लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी हा कायदा आणला गेल्याचा खोटा प्रचार करून आपल्या मुस्लीम बांधवांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळेच आंदोलने केली जात आहेत,’’ असे मोहन भागवत म्हणाले होते.

समाजकंटकांकडून जय श्रीरामच्या घोषणा देऊन एसटी बस पेटविण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या