32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयतर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ; मुख्यमंत्री केजरीवाल यांची मोठी घोषणा

तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ; मुख्यमंत्री केजरीवाल यांची मोठी घोषणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशातील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्याची मागणी केली आहे. केंद्राने जर जनतेला मोफत लस दिली नाही, तर दिल्ली सरकार दिल्लीकरांना मोफत लस उपलब्ध करुन देईल, अशी घोषणाच यावेळी केजरीवालांनी केली आहे. केजरीवाल याआधीपासून केंद्राकडे मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. पण केंद्राकडून अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा मोफत लसीकरणाचा मुद्दा उचलून धरला.

भारत देशात गरीबीचे प्रमाण अधिक आहे आणि गेल्या १०० वर्षांमध्ये पहिल्यांदाच अशा महाभयंकर महामारीचा सामना देशातील जनता करत आहे. लसीचा खर्च न परवडणारेही बहुसंख्य लोक देशात आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मोफत द्यावी, अशी मागणी केंद्राकडे केली होती. केंद्राकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो याची वाट आम्ही पाहत आहोत. केंद्राने जर मोफत लस उपलब्ध करुन दिली नाही. तर दिल्लीतील नागरिकांच्या लसीकरणाचा खर्च दिल्ली सरकार करेल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

देशात १६ जानेवारीपासून लसीकरण
सीरम इंस्टिट्यूटने ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला असून कोविशील्ड लसीची निर्मिती केली आहे. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यात सुरुवातीला देशातील अत्यावश्यक सेवेतील ३ कोटी अधिकारी आणि कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील नागरिक आणि गंभीर स्वरुपाच्या आजाराने ग्रासलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल.

टेस्लाचे देशात आगमन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या