22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीय‘आरटीओ’च्या सेवा घरपोच पुरवू : केजरीवाल

‘आरटीओ’च्या सेवा घरपोच पुरवू : केजरीवाल

एकमत ऑनलाईन

सुरत : गुजरातेत आपची सत्ता आल्यास प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) सेवा घरपोच पुरवण्याचे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी आज गुजरातेतील रिक्षाचालकांना दिले. अहमदाबादेत रिक्षाचालकांना संबोधित करताना ते बोलत होते.

गुजरातमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून भाजपच्या या बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्यासाठी आप प्रयत्नशील आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत रिक्षाचालकांनी आपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगत, प्रवासी व सोशल मीडियावरून आपचा प्रचार करण्याचे आवाहन त्यांनी रिक्षाचालकांना केले. केजरीवाल यावेळी म्हणाले, की कोरोना लॉकडाउनच्या काळात आप सरकारने जवळपास दीड लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या